त्याचं काय झालं...
काल पावसात येणार होतीस, त्याचं काय झालं ?
मला साथ देणार होतीस, त्याचं काय झालं ?
मला तुझं खरं वाट्लं, येणार म्हणून बरं वाट्लं.
वाट पाहीली ढ्साढसा, शांत होतो जमेल तसा.
तरी घाव खोल गेला, सावरुनही तोल गेला.
हाती हात घेणार होतीस, त्याचं काय झालं ?
माझी जबरदस्ती नाही, तू ही तेवढी सस्ती नाही.
तूझ्या अंगणायेवढी देखील माझी सारी वस्ती नाही.
जाणीव होताच थिजून जातो, पेट्ता पेट्ता विझून जातो.
नेमका विझून जातेवेळी, मन थिजून जातेवेळी,
थोडी आग देणार होतीस, त्याचं काय झालं ?
झालं गेलं विसरुन जा, वचन दिलं विसरुन जा.
मी तर काही बोलत नाही, तू जे केलं विसरुन जा.
आपलं आपलं बघू या, जमेल तसं जगू या.
पण ...तुफान पिऊन जगण्यासाठी,
मिळून स्वप्न बघण्यासाठी,
तुझे डोळे देणार होतीस, त्याचं काय झालं ?