गो. नी दांणडेकर यांची पूरीया या काव्यसंग्रहातील ही एक कविता
ऐकशील कारे
ऐकशील कारे माझे मुक्तछंद गीत?
मधुर भाव आले दाटुनी आले सख्या अंतरात.
मुक्या कल्पनांचा वारा मनी उताविळ
गळ्यातुनी झरता त्यांची उठे पुसट शीळ
शब्द शून्य संगिताचा जाणशील अर्थ?
पर्णकुर्टीपुढील माझ्या सुप्त पायवाट
आसअलि देवा घ्याया तुझी धुळ भेट
फ़िरकशील का रे केव्हा या रुक्ष वनात?