सख्या रे!!!

प्रिय मनोगतींना,


मनोगत वर मी तशी जुनीच आहे , पण मध्यंतरी कामाच्या तडाख्यात सापडल्याने भावना व्यक्त करणे राहुनच गेले..... आज खास वेळ काढुन मनातले भावुक क्षण इथे उतरवले...


अंजली.


----------------------------------------------


तुला बोलताना बघुन


शब्दच विसरुन गेले...


कधीच न विसरण्यासाठी


तुझे भाष्य मनात साठवत गेले...


 


आठवते मजला अजुनही


आपुली ती पहिली भेट...


भारावलेल्या मनानेच घेतला


मेंदुचाही ताबा थेट...


 


अजुनही स्मरते तुझे वचन


वस्त्र,दागिन्यांसकट घेइन तुझी काळजी...


अन अग्निलाही वाटेल हेवा


अशी जिंकलीस माझी मर्जी...


 


दिवसामागुनी दिवसागणिक


कसा बदलत गेलास रे...


हळ्व्या माझ्या स्वप्नांच्या


का अशा चिंध्या केल्यास रे...


 


मन घट्ट करुनी


सदैव माफ़ केले तुला...


निसटून गेलेले तारुण्याचे क्षण


सापडुन देशील का मला...