सुरकुत्या

कधी कुणी मोडतं घडी ,
विस्कटतं कुणी ....
मोडली तर वाटतं बरं मनाला
विस्कटलं तर टोचत राहतं
मोडली काय अन विस्कटली काय घडी ...
उरतात फक्त
सुरकुत्या .....