माहिति तंत्रज्ञान क्षेत्रातील सहभागित्व - विचार विनिमय सभा (मराठी-कन्नड तंत्रांश तज्ञांचा मेळवा)

      माणसाच्या विकासाची उंची ही तंत्रज्ञानामुळे वाढते तर त्याची खोली, व्याप्ती तो ज्या समाजामध्ये राहतो, त्या समाजाच्या संस्कृतीशी, तिच्या सृजनशीलतेशी निगडित असते. एखाद्या समाजाचा विकास हा एका अर्थी पूर्ण कधीच होत नसतो. तो सतत नव्या नव्या गोष्टी घडवत असतो आणि त्यातून विकास पावत असतो.
      सध्याच्या काळात संस्कृती बरोबरच तंत्रज्ञान फक्त गरजेचं नाही तर त्यांचा एकमेकांशी संवाद घडणं अपरिहार्य आहे. तंत्रज्ञान जर सांस्कृतिक आणि सामाजिक गरजा भागवू शकले नाही तर ते कितीही पुढारलेलं असूनही कुठेतरी अपूर्ण आहे आणि दुसरीकडे संस्कृती आणि समाज घडवणारे विचारवंत, लेखक यांनी जर तंत्रज्ञानाकडे दुर्लक्ष केले तर त्यांनी निर्मिलेली कोणतीही सृजनात्मक रचना किंवा ग्रंथ ह्यांना पूर्ण न्याय मिळू शकणार नाही. ते निर्मात्याच्या दृष्टीने पूर्ण असले तरीही समाजाच्या दृष्टी काहीसे अपूर्ण राहतील.
       तंत्रज्ञान आणि संस्कृती यांचा अर्थपूर्ण मेळ घालणे ही आपल्या सगळ्यांचीच जबाबदारी आणि त्याहून जास्त गरज आहे. या दोन्ही क्षेत्रातील लोकांनी प्रभावीपणे एकत्र येऊन एकमेकांच्या गरजांची जाणीव होऊ देणे, ह्या दोन धाग्यांना विणून त्यातून आपला समाज बळकट आणि समृद्ध करणे हे अत्यंत आवश्यक आहे.
      या विचारांनी Kannadasaahithya.com (Kanlit.com) चे रूप घडवले आहे. या संकेतस्थळाच्या मुंबई -पुणे स्थित समर्थकांनी वरील विचार जपणाऱ्या लोकांना मुंबईमध्ये एकत्र आणण्यासाठी आणि सहकार्याची क्षेत्रे शोधण्यासाठी पुढाकार घेतला आहे .
      सभेतील काही महत्वाचे मुद्दे हे असू शकतील
       १. मराठी, कन्नड आणि इतर प्रादेशिक भाषांचे सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्टीने माहिती तंत्रज्ञानातील स्थान
       २. तंत्रज्ञानातील संसाधनांचे प्रादेशिक साहित्य आणि संस्कृती यांच्या विकासातील स्थान
      ही सभा या आणि अशाच इतर मुद्द्यांबद्दल विचार विनिमय करण्यासाठी आयोजीत केली आहे. कृपया या प्रसंगी उपस्थित राहून आपले विचार मांडावेत ही विनंती.

    तारीख: ऑक्टोबर १५, २००६
    वेळ  : ३.०० वाजता सायंकाळी
    स्थळ : सभागॄह, तळ मजला, कर्नाटक संघ परीसर,
        मोघल रस्ता, टी. एच. कटारीया मार्ग
        माटूंगा (पश्चिम), मुंबई - ४०००१६
        दुरध्वनी : (०२२)-२४३७७०२

    आपले नम्र,
    कन्नडसाहित्य.कॉम मुंबई-पुणे समर्थक मंडळ

    संपर्क:
    श्री. रोहित आर., मुंबई ९३७२४७०९५
    श्री. चिदानंद बी., पुणे ९८८१४६५४८५
    श्री. नरसिंह दत्त, पुणे ९८९००९४०३४

http://www.kannadasaahithya.com
http://www.kanlit.com
http://groups.yahoo.com/group/kannadasaahithya_mumbai_pune