तूं नभीचा चंद्रमा मी मुग्धगंधा कुमुदिनी
पंक विस्ररुनी पायतळीचा आतुरा तव मीलनी
कनककलशच तूं सुधेचा, शतयुगांची मी तृषा
बिंदु बिंदुसाठी माझ्या अश्रुभरल्या किती निशा
अधिर झालें अधर कधिचे गावया जें रंगुनी
गीत तें, संगीत तें तूं मी तयातिल रागिणी
समचरण तव हेंच देवा स्वप्न माझें कांचनी
जाग ना येवो कधीही या समर्पित जीवनी
------------------------------------------------------------
ही कविता माझी नाही.
मनोगत वरील सर्व काव्यरसिकांना ही माझी अनेक शुभेच्छां सह दिवाळी भेंट.
आणि एक विनंती. ही कविता कोणाची आहे, हें कुणी कळवील तर आनंद वाटेल.
मनोगतच्या " आनंदाचे डोही " सतत " आनंदच तरंगावेत" ही मनोगतलाही
माझी शुभेच्छा !