मी एकटा आहे


मी एकटा आहे ... एकटाच राहणार आहे


मित्रांशी गप्पा मारताना, संवाद स्वतःशीच साधणार आहे


लोकाचांत असूनही ... वेगळा राहणार आहे


मदत करणारे खूप आहेत ... समजून घेणारे कमी


मैत्री करणारे खूप आहेत .. पण साथ देणारे कमी


म्हणूनच ...


मी एकटा आहे ... एकटाच राहणार आहे


चार चोउघात बसतो, गप्पा मरतो, हसतो - गातो


मनातून मात्र वेगळीच उत्तरं शोधत राहतो


सगळ्यानं बरोबर सगळी कडे जातो


मार्ग मात्र वेगळाच शोधतो


म्हणूनच ...


मी एकटा आहे ... एकटाच राहणार आहे


जीवाभावाचे सगळे ... स्वतःचाच मार्ग चालत आहेत...


स्वपनांच्या मागे आपल्या आपणच धावत आहेत,


मार्ग माहीत असून सुद्धा .. मीच मध्ये मध्ये अडखळतो आहे


कसे सांगू ..पण मीच पाहिलेले स्वप्नच मी शोधतो आहे…


म्हणूनच ...


मी एकटा आहे ... एकटाच राहणार आहे


मलाही वाटत आयुष्यांत मोठं व्हावं ..


लोकं लक्ष्यांत ठेवतील .. अस काहीतरी करून दाखवावं....


पण ते ही एकट्याने करणे भागच आहे.


माझे मन , माझे स्वप्न, माझे विचार,  माझे वागणे, माझे दुःखं


ऐकून सगळे .. मलाच वेडा ठरवलं आहे


म्हणूनच ...


मी एकटा आहे ... एकटाच राहणार आहे


..


शैलेश