या इथे डाव्याबाजूला एक,
जागा विकायचीय
कुणाला हवीय का?
........
काहीच प्रतिसाद नाही मिळाला...
मग त्याने थोडा विचार केला!
आणि जागेभोवति छान कुम्पण घातले
जागा खोट्या स्वप्नानी सजविली..
मग हळूहळू त्याला बदल जाणवू लागला..
आता, सगळे जाता येता ...
माना वळवून पाहू लागले ...
एखाद्दुसरा कटाक्षही टाकू लागले..
काही नजरा पुन्हा पुन्हा वळू लागल्या
आता त्याचा चेहरा थोडा खुललाय....
शेवटी ह्रिद्य विकायची कला त्यानेही
अत्मसात केली.