वात बनून जगायचंय
मलाही पेटायचंय ... वात बनून जगायचंय
लहान असून सुद्धा , तेजात तळपायचंय
छोट्याश्या जीवनात अंधारातील दिशा बनायचंय
धर्म धर्म करणाऱ्या अधर्मांना जाळायचंय
माणूस म्हणून जगणाऱ्या साठी आशेच किरण व्हायचंय
सूर्या समोर एकदा ज्योतिर्मय व्हायचंय
मी हि तुझाच अंश आहे , माझ्याच पित्याला सांगायचंय
मला मालवायला निघालेल्या वारया बरोबर लढायचंय
संघर्षाचा नवीन आदर्श घडवायचाय
मरतानाही शेवटचं एकदा फडफडायचंय
जातानाही अनेकांना वात देऊन जगवायचंय