मोड आलेले मुग , चणे किंव्हा आवडत असलेले कडधान्य -प्रत्येकी १/२ वाटी
१ कांदा (बारीक चिरलेला- सधारण १/२ वाटी)
१/२ टॅमाटो (बारिक चिरलेला)
चाट मसला (आवडी नुसार)
चिंच-गुळ चटणी आणि हिरवी चटणी सधारण २ चमचे (दोंन्ही चटण्या नेहमीच्या भेळीसाठी करतो तश्या कराव्या)
बारीक शेव, बरिक चिरलेली कोथिंबीर
३० मिनिटे
२ जणांसठी
प्रथम मोड आलेले कडधान्य उकडून घ्यावे (शिजताना चवीपुरते मीठ घालावे) पुर्णपणे शिजवू नये म्हणजे अगदीच त्यांचं पीठ होऊ देऊ नये . कुकराची १ शिट्टी पुरे.
उकडून थोडं गार झालेल्या कडधान्यांमध्ये कांदा , टॅमाटो , दोन्ही चटण्या आणि चाट मसाला (चाट मसाला असल्याने वेगळं अजून मीठ घालण्याची गरज नाही )घालून सर्व हलकेच एकत्र करून घ्यावे.
वाढताना बारीक शेव आणि कोथिंबीर भुरभुरून द्यावी.
नुसत्या मुगाची भेळ पण छान लागते. आवडत असेल तर दही पण घालून चालेल.
यांतील सामुग्री आवडीनुसार कमी -जास्त करून चालेल.
पण कडधान्य अधिक शिजू देऊ नये त्यांचा लगदा झाला तर खाताना मजा येत नाही.
माझी ताई.
निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरण
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.