कळजाला जाळले अन गायली माझी गझल
काल जेंव्हा वेदनेने माळली माझी गझल
ना कुणी मदतीस आले संकटी माझ्या कधी
पाहुनी मग दु:ख माझे धावली माझी गझल
आरसे लाजून जाती पाहती जेंव्हा तिला
मोगरा चाफेकळी की,सायली माझी गझल?
जोडला संबंध ऐसा मी तिचा माझ्यासवे
रूप मी आहे तिचे अन सावली मझी गझल
सोसले ते बोललो, पण वाहवा झाली अशी
मैफली जिंकून साऱ्या गाजली मझी गझल
--दर्शन शहा