आसचं कधी वाटतं जेव्हां

वाटतं सुखानेही तुझ्याकडे धाव घेताना


अचानक होणारा स्पर्श जाणावा


चुकून डोळ्यांतून अश्रु ओघाळला


तर आधी शिंपला शोधून आणावा


 


वाटतं तुझ्या आयुष्याच्या वाटेवर


सर्वत्र पसरली मखमल असावी


चुकून एखादा काटा कधी रुतला


तरी वेदना फुलांहून कोमल असावी


 


वाटतं देवानेही तुझ्यासाठी


नवस न बोलता पावावं


तू हाक मारण्याआधीचं


स्वःखुशीने तुझ्याकडे धावावं


 


तसं खूप वाटतं तुझ्याविषयी


पण हा कागद म्हणून बरं आहे


आणि तूझं ऐंकायचं झालं तर


तुझं अखंड आयुष्य अपूरं आहे


*******सनिल पांगे-------