तु असा
माझ्या श्वासात विरघळलेला
रक्तातून पाझरणारा
माझा जीवनरस.......
पेशीपेशीतून उमलणारा
अस्तित्वाचा तू कोवळा कोंब....
चेतासंस्थेचा तू भक्कम कणा
आसु हसु पसरविणारा....
सोसुन पोसुन पार जाणिवा-नेणिवांच्या
गर्द जाळ्यात बधीरणारी
मेंदूची तू तरल संवेदना.....
तू घाव दुधारी पात्याचा,
अंतरबाह्य जखमांचा
चिरंजिवी स्त्राव तू.....
रोमारोमात काट्यागत सलणारा
स्तिमित भाव तू......
न उकलणारा.....................!
शीला.