तुझ्या डोळ्यात पाणी
माझ्या डोळ्यात पाणी
माझ्या ओठांवर आज
आठवांची गाणी
एक क्षण तुझा
एक क्षण माझा
त्या नाजूक क्षणांची
बाकी राहिली देणी
तुझ्या डोळ्यात पाणी
माझ्या डोळ्यात पाणी
एक डाव तुझा
एक डाव माझा
त्या आपल्या खेळाची
अधुरी कहाणी
तुझ्या डोळ्यात पाणी
माझ्या डोळ्यात पाणी
एक स्वप्न तुझं
एक स्वप्न माझं
त्या गुलाबी स्वप्नांची
भंगलेली लेणी
तुझ्या डोळ्यात पाणी
माझ्या डोळ्यात पाणी
एक सूर तुझा
एक सूर माझा
त्या गंधर्व गीताची
झालीय विराणी
तुझ्या डोळ्यात पाणी
माझ्या डोळ्यात पाणी
-अनिरुद्ध अभ्यंकर