येत नाही..

आपल्याला आपल्यातला


दुरावा सांधता येत नाही,


धागे जुळलेत केव्हाचेच


आपल्याला बांधता येत नाही..


    प्रिती आहे माझी-तुझीही


    शब्दात सांगता येत नाही,


    तुझ्या डोळ्यातुन मला असे


    कधी-कधीच पांगता येत नाही...


       माझ्या स्वप्नांना आता


       मला धरुन राहता येत नाही,


       तुझ्याशिवाय डोळ्यांना माझ्या


       भरुन राहता येत नाही....


                               जयेन्द्र.