उंच माझा झोका ग!

उघडच असतं दार पिंजर्‍याचं,
अन पंखही नसतात छाटलेले
येतं पाखरू बाहेर
मस्त झेप घेतं आकाशात
पींजर्‍याभोवती फेरी मारतं एक छानशी आणि
येऊन बसत परत
पींजर्‍यातल्याच झोक्यावर,
बाजूलाच बहरलेल्या
उंच गुलमोहराकडे बघत
गुणगुणतं मजेत,
उंच माझा झोका गं.............!