आज मला थांबवू नका
माझं मन जे मी व्यक्त करतोय
उद्या नसीन कदाचित तुमच्यात
आज स्वत:स मी मुक्त करतोय
हव्यास नाही माझी,
जे हजारोचं नि लाखांचं आहे
मी भूकेला असलो तरी
तेच खातो जे हक्काचं आहे
मी फूल घेऊन ओंजळीत
ते काटयांसारखे बोचू पाहतात
मी टाचनी घेऊन हातात
ते तलवारीन टोचू पाहतात
मी दबक्या पावलांनी शिरलो
त्यांनी चोरीचा आळ केला
मी भविष्य रचनार होतो
माझा रितसर भूतकाळ केला
मी सकाळचा इवलासा दव
ते उल्कासारखे कोसळतात
मी न खवळलेला समुद्र
ते सुनामी होऊन उसळतात
मी सत्य दाखवणारा आरसा
ते दगड घेऊन धावतात
मी शांत तेवणारा दिपक
ते तेलालाच आग लावतात
मी नितळ, हळूवार सांज वारा
ते वादळं होऊन पेटतात
मी नेत्रांना सुखवणारं काजळं
ते अंधत्व वाटतात
मी चिऊ, मैनेला दाने घालतो
ते प्रेतं खणून गिदाड बोलवतात
मी भोजनात अमृत मिसळवतो
ते त्यातही विष कालवतात
मी डोलणारा कल्पवृक्ष
ते मूळ माझा तोडी
करून देहाचं बोकडं
ते विकतात आज माडी
मी नम्रतेने मान झूकवली
ते आदाराला भीतीत मापतात
मी प्राणवायू बनून जिवन फुलवलं
ते श्वासांचीही नाळ कापतात
@सनिल पांगे