बघ माझी आठवण येते का??
मुसळधार पाऊस......सुरु होईल मनात
ऑफिसच्या खिडकित उभी राहून पहा...
बघ माझी आठवण येते का..
हात लांबव तळहातावर घे पिसीचे कीबोर्ड.
आणि ये मनोगतावर.
बघ माझी आठवण येते का????
वाऱ्याने उडनारे फाईल मधले पेपर्स सांभाळुन ठेव.
आणि कर मग येण्याची नोंद मनोगतावर.
वेगवेगळ्या साहीत्य प्रकारात.तल्लीन हो.
नाहीच जमलं काही तर कविता वाचून काढ
व्यक्तीगत निरोप चेक कर.
इनबॉक्स वर ये.तो भरलेला असेलच.
मग वाचू लाग.
कुणाला तरी कारण नसतांना निरोप दे.
वाचत राहा कंटाळा येइपर्यंत
न आवडनाऱ्या न वाचाव्या वाटणाऱ्या कविता.
मग..
बघ माझी आठवण येते का???.
घड्याळात पाच वाजतील.
तुला निघायची घाई असेल.
तितक्यात माझा एसेमेस येइल.
तू तो इच्छा नसतांनाही बघ.
तुला वाटेल काय करु.
तु म्हण सर्व्हर डाऊन होता.
मग थोडे लेखन कर मनोगतावर.
तुही वाच.तुझे लेखन
तुला तुझे लेखन डीलीट करावे वाटेल.
मग एखादी कविता वाच.
बघ माझी आठवण येते का???
मग निघायची वेळ होईल.
आणि मनोगत आजारी पडेल.
सुधारणा,बदल,दुरुस्त्या,चालू राह्तील.
मग पुन्हा गुगल वर ये.
काय करु असा विचार येईल
मग शट डाऊन कर तुझा संगणक
मग नुस्तीच खुर्चीला रेलुन राहा.
तुझ्या मनात असंख्य विचार येतील.
त्यांना फॉरवर्ड कर कुठेतरी
नाहीच जमलं तर
शेवटी सगळे डीलीट कर.
आता रिकाम्या इनबॉक्स कडे बघ.
बघ माझी आठवन येते का ?