इतिहास आणि पुनरावृत्ती

इतिहासाची पुनरावृत्ती होते

आणि पुनरावृत्तीचा इतिहास होतो

आपण मात्र श्वासाला श्वास

चिकटवत बसून राहतो

कारण

पुनरावृत्ती घडवायची ताकद

आता इतिहासातच उरली आहे

आणि इतिहास घडवायची ताकद

आता पुनरावृत्तीतच उरली आहे