'वेगळं रहायचं' या विषयावर नुकतीच भरपूर चर्चा झाली. मी पाहिलेल्या एका मॉडर्न एकत्र कुटुंबाचे चित्र हे असे आहे.
घरांत एका नांदत होते भिन्न प्रकृतीरंग
व्यासंगी हव्यास आणि हव्यासी व्यासंग ॥
हुशार होते तसे सर्वजण मोठ्या पदव्या गांठी
तारतम्य परि नव्हते कोणा सुखी जीवनासाठी ॥
चष्म्यातुन ते पहात होते एकदुजांचे दोष
मनांमनावर चढले होते निजगंडाचे कोष ॥
धुसपुस, कुरबुर, अविश्वास अन प्रबळ शीतयुद्ध
घरास नाही घरपण उरले म्हणती जरावृद्ध ॥