माझपण

आजकाल माझ्यावरच

मला दया येते

तू फक्त माझाच असावास

असे सारखे वाटते!

तू माझा असणं

म्हणजे नक्की काय?

तुझं मन की शरीर?

दोन्ही माझ्या ताब्यात

असू शकत नाहीत

तुझ्या कर्तव्य, जबाबदाऱ्या

मी अडवू शकत नाही

माझ्यावरच मला आता

हसावेसे वाटते!

मी फक्त तुझीच व्हावे

असेच सारखे वाटते!

कदाचित असे घडूही शकते

तुझे विचार, तुझ्या जबाबदाऱ्या

काही अंशी मी पेलू शकते !

प्रत्यक्षात कुणी कुणाचे नसते

प्रत्येक व्यक्ती आप-आपल्या

तत्त्वानुसार जगत असते!

तू माझा किंवा मी तुझी

हे एकमेकांच्या सामंजस्यावर

अवलंबून असते!