पाऊस

कोसळणाऱ्या पावसात झालेली ओलिचिंब ओळख पुन्हा पाऊस पडावा अशी

कोसळणाऱ्या पावसात दूरवर सोबत असावं त्यानं असं वाटणारी हुरहुर जशी......

ओघळणारा प्रत्येक थेंब मनात दाटून राहतो

ओठांवर आलेला प्रत्येक शब्द त्याला बघून हरवतो......

का होते वेडी राधा सावळ्यासाठी ते आज समजले

सावळ्यात हरवून मी ही थेंब होऊन नाचले......