काय सान्गु राव माझ आयुष्यच बदललय.......


खंर सान्गतोय हे सगळ मी नाही केल
माझ्या वेड्या मनाने करवलय
तीच्याशी बोलल्यानंतर ते कुठतरी हरवलय
काय सान्गु राव माझ आयुष्यच बदललय.......

आता ते नेहमी जाणवणा-या एकटेपणाच्या वेदना विसरलय
बदल्यात त्याने प्रेमभावनान्ना जाग केलय
काय सान्गु राव माझ आयुष्यच बदललय.......

माझ्या आयुष्यात आज अस काही घडलय
नेहमी जिन्कणारं आज तिच्यासमोर हरलय
तिच्या मोहक बोलण्याने ह्रुदयावर मोरपिस फ़िरवलय
काय सान्गु राव माझ आयुष्यच बदललय.......

ती सान्गेल तेच करायच असे मी ठरवलय
कॉलेज मधल "chain smoker" हे मानाच पदक मी पटकवलय
पण आता "तु सिगरेट सोड" या तिच्या तिन शब्दान्नी मला अडवलय
काय सान्गु राव माझ आयुष्यच बदललय.......

कधी काळी मैफ़ीलीन्ची शान असायचो मी
आजकाल तिच्या शब्दान्नी भरल्या मैफ़ीलीतुन मला उठवलय
काय सान्गु राव माझ आयुष्यच बदललय.......

मनाने आणि तिच्याशी वेग़ळच नाते जोडलय
बहुधा माझ तिच्यावर प्रेम जडलय
काय सान्गु राव माझ आयुष्यच बदललय.......

एक विषेश सान्गु मित्रान्नो

ऊद्या तिने मला भेटायला बोलावलय
ऊद्या तिला मनातल सगळे सान्गायच असे मी ठरवलय
ती देईल त्या उत्तराला सामोर जायच्या तयारीला मन माझ लागलय
काय सान्गु राव माझ आयुष्यच बदललय.......

मन वेड माझ मलाच चिडवतय ....म्हणतय..
"चला म्हन्जे या भन्गाराच महत्व 'कोणालातरी' कळतय..."
@सचिन.......