बांधले मंदिर त्यांनी, मीच त्यांचा देव नाही!!
मंदिरी या भावनांना आज काही भाव नाही!!
आरत्या ओवाळल्या जरी अन किरीट घातले!!
दैवताच्या मानसाचा माणसांना ठाव नाही!!
घेतले मम नाम किती, अन डाव तुम्ही मांडले!!
भावनांना आज माझ्या या सम असा हा घाव नाही!!
जिंकला तो धर्मराज अन तुम्हा कौतुक असे!!
आजही आत्म्यास त्यांच्या, स्वर्गी त्या शिरकाव नाही!!
देवतांच्या कल्पनेचा आज कोणा ठाव नाही!!
तो म्हणे चाणक्य वेड्या भावनेला गाव नाही!!