तू आणि तुझे बोलणे
शब्द जमीनीवर सांडले
पक्षी होऊन कानांनी माझ्या
सारे
पटापटा टिपले.
तू आणि तुझे बोलणे
कधी मऊ कधी अलगद
मोर पिसार गालावरुन
जसा फिरावा सहज.
तू आणि तुझे बोलणे
फक्त डोळ्यांनी
मग भांडावे
माझ्या डोळ्यांशी
माझा कानांनी.
तू आणि तुझे बोलणे
संगीताचा नवा
तरंग
मन माझे वेडे
त्यावर नाचण्यात दंग.
तू आणि तुझे बोलणे
कधी
लाडीक कधी हट्टी
हॄदयाची होते मग
माझ्या मनाशी कट्टी.
तू आणि तुझे
बोलण
माझ्यावर रागावले
त्या दिवशी कान माझे
कायमचे हरवले.
तू आणि
तुझे बोलणे
आता फक्त आठवण
बडबडणार्यांच्या दुनियेत
माझी शब्दांसाठीची
वणवण.
-उमेश