पर्यावरण दिनानिमित्त-
विषाचा प्याला
फळे भाज्या अन धान्य सारे
सगळ कस दिसाव ..सुंदर नि आकर्षक
बारा महिने मिळाव हव ते ...हव तस
बघितली ना साखर जी मुंगी खात नाही?
पाहिलीत ना फळ ज्यावर एक डाग नाही!
वर्षापूर्वीच्या धान्यात एक किडा नाही!
हिवाळ्यात टरबूज, पावसाळ्यात पालेभाज्या
सगळी आहे तंत्रज्ञानाची धमाल..
निळ्या वेलाला उद्या केशरी स्ट्रॉबेऱ्या..
किटकनाशकांच्या फवाऱ्याचा असा कमाल
खते कोणती, पाणी कोणते, बीज कसे...
हवे कशाला तुम्हाला नसते सवाल?
जगभरातून आणा फक्त जेव्हा जे ..जसे हवे ...तसे
मांडीवर शांततपणे तृप्त बाळकृष्ण निजे!
उद्याचा भविष्याला आजचे संवर्धन..तुम्हाला हवे तसे!
पण
ओळखू येईल का तुम्हा प्रत्येक बेसावध आईत
शिरलेली ...पूतना ...जेव्हा... खदखदून हसे?