बिंदुकली

एक  छोटी वेल, नभाकडे पाहे
ऊन वारा साहे एकलीच

एक मोठे झाड, उभे दिमाखात
पक्षी येत जात  अंगावरी

झाड आणि वेल, कार्यी  मग्न होते
मोठे स्वप्न होते मनामध्ये

पायाशी वाढले,  कोवळे गवत
होते आनंदात.. झाडवेल

हळू उगवली  जोमाने वाढली
एक बिंदुकली ... चिवटशी

पसरूनी जाळे  झाडावेली वर
झाली शिरजोर ...कळले ना!