"प्रतिज्ञा"

रम्यं ही संध्या

पुन्हा कधी असेना,

गगनातं गुंग व्हाया,

साथ तुझी मिळेना.......

बोचऱ्या या थंडीतं,

प्राण काही निघेना,

डोळ्यातील अश्रु मझ्या,

हात तुझा पुसेना.......

आठवण फक्तं तुझीच,

मनी मझ्या दाटली,

मेघास या प्रिये,

लाज त्याची वाटली.......

बरसून आज त्यानेही,

लाज माझी राखली,

जगेनं तुझ्या वीनाही,

प्रतिज्ञा आज मी केली......

-नचि.