आपले मनोगतवर स्वागत आहे. इंग्रजी लेखन करण्यासाठी कंट्रोल आणि t एकदम दाबून मग लेखन करावे. पुन्हा मराठी लिहिण्यासाठीही हाच कळसमूह (कीस्ट्रोक्स) वापरावा.
हे लिखाण मला मराठी ब्लॉग वर देखील वाचता येईल का? -- हा प्रश्न समजला नाही. येथे लिहून ब्लॉगवर चिकटवले आणि युनिकोड एनकोडिंग असले तर ही अक्षरे तेथे वाचता येतील.
मराठी लेखनासंबंधी अधिक माहितीसाठी हा दुवा पहा. मराठी शुद्धलेखनासंबंधी आणि येथे उपलब्ध असलेल्या शुद्धिचिकित्सकाच्या सोयीबद्दल या दुव्यावरील काही उपयुक्त माहिती अशी --
आपण जेथे जेथे लेखनाचा मजकूर तयार करतो तेथे तेथे वर असे चित्र दिसेल त्यावर टिचकी मारली की नवी खिडकी उत्पन्न होते आणि त्याच वेळी आपण लिहिलेला मजकूर मनोगतच्या शुद्धिचिकित्सकाकडे पाठवला जातो. तेथे तो तपासून परत आला की तो त्या नव्या खिडकीत दिसतो. त्यातल्या (शुद्धिचिकित्सकाला) अयोग्य वाटलेल्या शब्दांना अधोरेखित केलेले असते. एकेका शब्दाला पर्याय सुचवलेले असतात. त्यातले निवडणे, न निवडणे आपल्या हातात असते. अश्या प्रकारे सुधारणेचे काम झाले, की त्या खिडकीच्या तळातील 'झाले' ह्या बटणावर टिचकी मारली की सर्व सुधारित मजकूर आपण मुळात लिहिलेल्या मजकुराच्या जागी लिहिला जातो.
मात्र हे सगळे होण्यासाठी एक आवश्यकता आहे. आपल्या संगणकावर ब्राऊझरमध्ये अश्या 'उत्पन्न' खिडक्यांना मज्जाव असेल तर शुद्धिलेखन चिकित्सकाची खिडकी उघडण्यासाठी अश्या खिडक्यांना ह्या संकेतस्थळापुरती मुभा द्यावी लागते.