एप्रिल २००५

शुद्धिचिकित्सक

मनोगतच्या एका सदस्याचे हे निरीक्षण आहे.

परंतु या site वरील लेख, विचार वाचताना एक गोष्ट मात्र जाणवली, ती म्हणजे काही ठिकाणचं अशुद्ध मराठी. (हे माझं लिखाणही त्याला अपवाद आहे असं मी म्हणत नाही). पण केवळ र्‍हस्व दीर्घाबाबत मी बोलत नाहीये. तर टंकलेखनातील चुकांबद्दलही काही लेखांमध्ये थोडा निष्काळजीपणा दिसत आहे. उदा. n वापरुन 'न' हे अक्षर तयार होत आहे, पण 'ण' लिहिण्यासाठी मात्र N लिहिणे आवश्यक आहे. तेवढी ही काळजी काही लोक घेत नाहीयेत.

थेट देवनागरीत मराठी लिहिता यायला लागल्यापासून अनेक जण उत्साहाने मराठी लिहीत आहेत ही आनंदाची गोष्ट आहे, हे निश्चित. मात्र रोमनऐवजी देवनागरीतून मराठी लिहिले जाऊ लागल्यानंतर अश्या टंकलेखनातल्या आणि शुद्धलेखनातल्या चुका स्पष्टपणे जाणवू लागल्या.  अश्या दोषांवर उपाय म्हणून आम्ही मनोगतावर देवनागरी लिप्यंतराच्या साहाय्यासाठी तक्ता ठेवला. त्याचाही सदस्य उत्तम प्रकारे उपयोग करून घेऊ लागले.

ह्या पुढचा उपाय म्हणजे शुद्धलेखनाच्या नियमांविषयी अनेकांच्या मनात संदेह आहे असे जाणवल्याने आम्ही सुखदा खरे ह्यांच्या अनुमतीने त्यांनी मायबोलीवर लिहिलेल्या काही लेखांच्या आधारे शुद्धलेखनाचे पुस्तक बनवून येथे ठेवले, त्याचा ही अनेकांना फायदा झाला. त्याच वेळी इंग्रजीतील स्पेल चेक च्या धर्तीवर आपण मराठीसाठी शुद्धलेखन तपासणीची सुविधा तयार केली तर त्याचा जास्त थेट उपयोग करता येईल, असे वाटले आणि त्यानुसार आमची शोधाशोध चालू झाली.

इंग्रजीतील स्पेल चेक साठी सेवादात्याकडे आस्पेल म्हणून सुविधा असते, मात्र मराठीतल्या शब्दांचा विचार करता अनेक बाबतीत अपुरी वाटली. तेंव्हा सर्व काही 'मुळापासून' सुरू करणे आले. त्यामुळे गेल्या वर्षी दसर्‍याला पाटीपूजन करून आम्ही कामास सुरुवात केली आणि आज पाडव्याला निदान काही मर्यादेपर्यंत थेट वापरता येईल असा शुद्धिचिकित्सक आम्ही तयार करू शकलो हे सांगण्यास अतिशय आनंद होत आहे.

आपण जेथे जेथे लेखनाचा मजकूर तयार करतो तेथे तेथे वर असे चित्र दिसेल त्यावर टिचकी मारली की नवी खिडकी उत्पन्न होते आणि त्याच वेळी आपण लिहिलेला मजकूर मनोगतच्या शुद्धिचिकित्सकाकडे पाठवला जातो. तेथे तो तपासून परत आला की तो त्या नव्या खिडकीत दिसतो. त्यातल्या (शुद्धिचिकित्सकाला) अयोग्य वाटलेल्या शब्दांना अधोरेखित केलेले असते. एकेका शब्दाला पर्याय सुचवलेले असतात. त्यातले निवडणे, न निवडणे आपल्या हातात असते. अश्या प्रकारे सुधारणेचे काम झाले, की त्या खिडकीच्या तळातील 'झाले' ह्या बटणावर टिचकी मारली की सर्व सुधारित मजकूर आपण मुळात लिहिलेल्या मजकुराच्या जागी लिहिला जातो. 

मात्र हे सगळे होण्यासाठी एक आवश्यकता आहे. आपल्या संगणकावर ब्राऊझरमध्ये अश्या 'उत्पन्न' खिडक्यांना मज्जाव असेल तर शुद्धिलेखन चिकित्सकाची खिडकी उघडण्यासाठी अश्या खिडक्यांना ह्या संकेतस्थळापुरती मुभा द्यावी लागते.

ह्या शुद्धिचिकित्सकाचा वापर जो जो जास्त होऊ लागेल तसतश्या त्यातल्या अधिकाधिक चुका सापडत जातील आणि त्या सुधारून तो अधिकाधिक सक्षम होत जाईल असा आम्हाला विश्वास आहे.

.... अपूर्ण

(नेहमी वाचत जा, काही ना काही भर घातलेली असेल.)

Post to Feed... पाऊल पडते पुढे!
उत्तम
सही रे सही...
अत्युत्तम
सुद्लेकन...
स्तुत्य उपक्रम
छान
अभिनंदन, धन्यवाद आणि म
हार्दिक शुभेच्छा
चित्त/मार्गदर्शन
असे कसे?
नियम/"हार्दिक" बद्दल...
धन्यवाद
मान्य !
सुधारणा
शब्दांची यादी
सहमत/तयार !
तपासणी
शुध्दता
मीराताई म्हणतात तसेच!
धन्यवाद
हुरूप आला पण ...
कप
अद्याप शुद्धिचिकित्स
कशायपेयपात्र
'ष'!
मनोगतवर लिहिताना शुद्
ऐतिहासिक पाऊल
तपासणी
काही सूचना!
माहीत असावे
ठीक/आभार...
कठि-ठीण
कित्येक शब्द !
अपेक्षा आणि पूर्ती
टीका
शुद्धिचिकित्सक
मला आता कळ्ल !
तात्या माफ़ी असावी !
अंशतः असहमत
मान्य!
सहमत
असहमत!
शु. चि. तल्या चुका
चि. शुचिबद्दल
दुरुस्ती
जेहेत्ते असे आहे
संधी होताना त् चा ज् होतो
'शु. चि. चे शिक्षण' संदर्भात प्रश्न
सहमत
पण...पण
शुद्धलेखन चिकित्सक
चांगली बातमी पण...
काही शंका
डोळस छाननी
अवांतर: आटोपणारे
आटपणे आणि आटोपणे
दोन्ही बरोबर
धन्यवाद
डिसेबलावस्थेत
डिसेबल = निकामी
ब्लॉगर वर शुद्धलेखन संपादन
ब्लॉगरवर म्हणजे कशावर?
एक युक्ती
नुसतेच शुद्धलेखन...
किती ही अशुद्धता
हा उपरोध नसावा असे वाटते
नाही; दोन चुका
अनमोल मदत
उत्तम अतिउत्तम
प्रतीसादाला उत्तर
त्या ब्‍लॉगरचे काय झाले?
भादवा
भादवा

Typing help hide