...प्रीत होती

सोनालीताई जोशी यांनी बेधकपणे म्हटले "धीट माझी प्रीत होती" आणि आम्हास आमच्या प्रीतीबद्दल ('प्रीती'इथे सर्वनाम आहे, विशेषनाम नाही याची वाचकमित्रांनी व खासकरून मैत्रिणींनी कृपया नोंद घ्यावी.)
इतके दिवस मूग गिळून बसल्याची अत्यंत लाज वाटू लागली. तेव्हा
सोनालीताईंपासून स्फूर्ती घेऊन आम्ही आज आमच्या प्रीतीचा कबुलीजबाब
वाचकांसमोर ठेवीत आहोत.

खात होती, पीत होती
झिंगुनी नाचीत होती

कापणे अलगद गळा ही
कुंतलांची रीत होती

ढोंग होते सोवळ्याचे
(स्पर्शुनी खिजवीत होती)

पाहुनी ना पाहिले मज!
(छेड ती चिंतीत होती)

सोस होता पुरुरव्याचा
अप्सरा मस्तीत होती

हे कुठे होते विडंबन?
'खोडसाळी' प्रीत होती