तु नसतेस जेव्हा ..........!
शब्द सुद्धा मुके होतात , आठवणींच्या पावसात भीजुन गुपचुप बिचारे पडून असतात..........
तु नसतेस जेव्हा ..........!
फ़ुले सुद्धा कोमेजुन जातात, निर्माल्याच्या संगतिनं पुन्हा ते विसर्जित होतात........
तु नसतेस जेव्हा ..........!
भावना सुद्धा शिथिल होतात , उदासीच्या पुरात दूरवर मला त्या वाहुन नेतात..............
तु नसतेस जेव्हा ..........!