दह्यातली कारली

  • ४ मध्यम आकारची कारली
  • पाव किलो दहि
  • दोन मध्यम आकाराचे कांदे
  • चिंचेचा घट्ट कोळ(पाव वाटि)
  • पाव वाटि गुळ (पाण्यात भिजवून)
  • गरम मसाला १ चहाचा चमचा
  • डाळिचे पीठ ४ चमचे
  • तिखट व मीठ चवीनुसार
३० मिनिटे
४ जणांसाठी

प्रथम कारल्यांना उभे काप देउन आतील बिया काढून टाकाव्यात. एका पसरट पातेल्यात वा कढईत कारली व दहि एकत्र शिजत ठेवावीत. कारली बऱ्यापैंकी मऊ झाल्यावर व दह्याचे गोळे होऊ लागल्यावर ती काढून घ्यावीत व त्यावरील दहि झटकून टाकावे. नंतर कारल्यांना चिंच-गुळाचे घट्ट पाणी लावून ठेवावे. कांदे किसून घ्यावेत. तव्यावर तेल घेऊन त्यात किसलेले कांदे, लालसर होईपर्यंत भाजून घ्यावेत. मग त्यात अर्धा चमचा गरम मसाला, तिखट व मीठ घालावे व परत थोडेसे परतून घ्यावेत. मिश्रण थोडे थंड झाल्यावर कारल्यात भरून घ्यावेत. मग कारल्यांना दोरा गुंडाळून तोंड बंद करून घ्यावे. डाळिच्या पीठात अर्धा चमचा गरम मसाला, तिखट, मीठ व हळद घालून कोरडेच एकत्र करून घ्यावेत, मग ह्या मिश्रणात कारली घोळवून घ्यावीत व तव्यावर थोड्या तेलात खमंग परतून घ्यावीत.     

अशा प्रकारे केलेली कारली कडू लागत नाहीत, त्यामुळे लहान मुलेही आवडीने खातात.

सासूबाई