माहिती हवी आहे

काही वर्षांपूर्वी म.टा. मधे एक लहान मुलावर छान कविता आली होती. त्यात जरी गणेश आरतीचे विडंबन होते तरी कोणत्याही संस्कृतीरक्षकाला त्याचा राग आला नसता. मला ती अर्धवट आठवत आहे. कोणाला पूर्ण कविता आठवत असेल तर कृपा करुन मनोगतवर कविच्या नांवासकट पाठवावी.

जय देव जय देव जय छोट्या देवा
आमच्यावरती धरिला का तुम्ही रुसवा
सांगा रात्री दुखले कोणाचे पोट
खिशात तरीही अजुनी आहे लिमलेट
....................................
.....................................
हाताची घडी तोंडावर बोट
दर्शनमात्रे होतो हास्याचा स्फोट.

मधल्या ओळी व क्रम आठवत नाही.