निळा((कन्)फुजन)

सध्या सगळीकडे बोकाळलेला 'फ्यूजन' किडा काल अम्हाला चावला आणि त्याचाच परिणाम म्हणजे कुमार जावडेकरांच्या हजलेचे आम्ही केलेले विडंबन आणि 'रंग माझा तुला' च्या चालीच झालेलं हे (कन्)फुजन.

ठोकला येव्हढा काल त्यांनी मला
आणि झालो बघा आज काळानिळा

दे मला तू सखे कोंबडी एकदा
रोज खातोच ना भात मी हा शिळा

लाजुनी लाल ती काल झाली अशी
मी म्हणालो तिला पाहू दे त्या तिळा...

भोपळ्या सारखा होत गेलो इथे
बायको सांगते राव थोडे गिळा

वाचता काव्य हे "केशवा"चे असे
बोलले ते कवी दाब त्याचा गळा