पिंपरी-चिंचवड विभागीय मराठी साहित्य संमेलन-२००७

श्री झुंझारराव सावंत व श्री. दत्ता राशिनकर हे या संमेलनाचे प्रणेते आहेत. संमेलन २ दिवस चालले. उद्घाटन ३० मे २००७ ला सकाळी १०:३० वाजता श्री. नरेंद्र जाधव, कुलगुरु, पुणे विद्यापीठ यांचे हस्ते झाले. प्राचार्य शिवाजीराव भोसले हे अध्यक्ष होते. डॉ वैशाली घोडेकर व इतर नामांकित साहित्यिक व्यासपीठावर उपस्थित होते. उद्घाटनाच्या वेळी स्मरणिकेचे प्रकाशन झाले. या मध्ये पिंपरी-चिंचवड शहर व परिसर या भागातील साहित्यिकांचे गद्य, पद्य वाङमय व वैचारीक लेख आहेत. निरनिराळ्या विषयावरील एकूण ७ सत्रे  उत्साहात पार पडली. सांगता ३१ मे २००७ ला सायंकाळी ६ वाजता प्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या भाषणाने झाली.

अधिक महितीसाठी संपर्क साधण्याचा पत्ता खालिल प्रमाणे.

madhavraob@yahoo.co.uk

साहित्यप्रेमीनी आपल्या शुभेच्छा वरील पत्यावर कळवाव्यात. आपले योगदान पाठवण्याबाबत वरील पत्यावर पत्रव्यवहार करावा. आपले योगदाव पुढील नियतकालात छापले जाईल. गद्य, पद्य, वैचारिक लेख, आढावा याप्रकारातील सर्व साहित्य वरील पत्यावर पाठवा. सध्या तरी मोबदल्याची आशा करु नये.

कार्यक्रम व निमंत्रण पत्रिका घेण्याकरता येथे टिचकी मारा.

जास्तीत जास्त मराठीप्रेमीनी सम्मेलनाचा लाभ घेतला.

प्रमुख मुद्दे: सम्मेलनात खालील मुद्दे प्रामुख्याने चर्चिले गेले.

१. शुद्ध मराठी म्हणजे काय?

२. मराठी वर इतर भाषांचे अतिक्रमण कितपत मान्य करावे.

३. वृत्तपत्रातील मराठी भाषा कशी असावी.

४. मराठीतील आद्य साहित्य व महानुभव पंथाचे योगदान.

५. विभागीय साहित्य संमेलनाची आवश्यकता

६. मराठी भाषा का टिकली पाहिजे?

७. दिवाळी अंकांचे योगदान

स्थानिक वृत्तपत्रे व स्थानिक वाहिन्यानी संम्मेलनाच्या बातम्या ठळकपणे छापल्या/प्रसारीत केल्या.