मुळ्याची भाजी

  • एक जुडी मुळा (पाल्यासकट)
  • पाव वाटी तूरडाळ
  • २ हिरव्या मिरच्या
  • ४-५ लसणीच्या पाकळ्या
  • एक मोठा कांदा, पाव वाटी ओले खोबरे,
  • पाव चमचा हळद, एक चमचा साखर, मीठ , फोडणीसाठी तेल.
१५ मिनिटे
४ जणांसाठी

मुळा धुवून पाल्यासकट बारीक चिरून घ्यावा. कांदा बारीक चिरावा. तूरडाळ दोन तास आधीच भिजवून निथळत ठेवावी.

तेलाच्या फोडणीत लसणीच्या पाकळ्या ठेचून टाकाव्या मग त्यात हिरवी मिरची हळद व तूरडाळ टाकून जरा परतून बारीक चिरलेला कांदा परतावा.  व मुळ्याची भाजी त्यात घालून एक वाफ येईपर्यंत परतावे. मग पाण्याचा एक हबका मारून झाकणीवर पाणी ठेवून भाजी शिजवावी. भाजी शिजली की मीठ, साखर चवीप्रमाणे व ओले खोबरे घालून भाजी गरमा गरम फुलक्या बरोबर वाढावी.

ही भाजी तेलावर परतून जास्त करून वाफेवरच शिजवावी. पाणी घालून शिजवली तर चव  कमी होते.

आई