जपून चाल बेवड्या ...

समस्त बेवडे मंडळी आणि मंगेश पाडगावकरांची माफी मागून..

जपून चाल बेवड्या, जपून चाल...
वाटेतल्या माणसांच्या जीवाचे हाल ! ॥ध्रु॥
अवघडून वळून बघायची खोड
नागमोडी चालीला नाही या तोड
डोळ्यात लाली आणि तोंडात लाळ ॥१॥
धुंदीत आपल्याच रंगात रं
विजेची लवलव अंगात रं
खट्याळ बोलण्याला आवर घाल ॥२॥
झिंगितं झिंगितं जातोस तू
तेच तेच गाणं गातोस तू
रिकाम्या बाटलीचा धरून ताल ॥३॥
मनात लागलेय नाचाया मोर
पाहून सगळ्यांना चढलाय जोर
परी बायकोच्या काळजाचा चुकेल ताल ॥४॥
जपून चाल बेवड्या, जपून चाल...

बंड्या...