मुगाची भजी

  • १ वाटी मुग ( आधी ५ तास भिजवलेले असावेत)
  • ३-४ हिरव्या मिरच्या
  • हळद
  • चवीपुरते मीठ
  • तान्दळाचे पिठ १ चमचा
  • तळण्याकरिता तेल
१५ मिनिटे
दोघासाठी (एका वेळेस)

प्रथम मुग व मिरच्या हळद-मीठ घालुन वाटणयंत्रातुन वाटुन घ्यवित. हे वाटण एका भाण्ड्यामधे काढुन त्यात तान्दळाचे पिठ व्यवस्थित कालवावे. तेल तापल्यावर त्यात छोटी-छोटी भजी टाकावित. लालसर रंगावर तळुन घ्यावी व गरम गरम वाढावी.

सॉस बरोबर हि भजी छान लागतात आणि चहाचा आनंद द्विगुणित करतात.

स्वतः