संदर्भासहित स्पष्टीकरण- लोकसत्ता- ग्राफिटि वॉल

रोजचा पेपर माझ्याप्रमाणे इथे अनेक जण वाचत असतील. त्यातील  काही आवडणाऱ्या, टोचणाऱ्या ,हसवणाऱ्या गोष्टींवर चर्चा अथवा विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी मनोगताचा मला उपयोग होतो एवढे नक्की. दोन तीन प्रतिसाद असतात पण लिहिण्याचे सार्थक झाले असे वाटणारे!

कविता, कवितेवर होणारी टीका, कवितेचा आस्वाद आणि त्यावरून आडाखे बांधणाऱे अनेक असतात. पण शालेय अभ्यासक्रमात असणारा 'संदर्भासहित स्पष्टीकरण' हा खास जिव्हाळ्याचा विषय ठरेल म्हणून कविता महाजन यांचा संदर्भासहित स्पष्टीकरण ग्राफिटि वॉल मधील हा लेख इथे देते आहे.

कविता शिकवणारे शिक्षक , त्यांच्या खास लकबी, आवड निवड , संदर्भासहित ...हा प्रश्न योग्य अयोग्य कसा होता... त्याने कवितेविषयी आपली मते काय झाली, कवितेपासून आपण दूर गेलात का  याविषयी चर्चा करता येईल.