हॉलीवूड मध्ये मराठी संजीवक

कालच्या म.टा. मध्ये हा बातमीवजा लेख वाचायला मिळाला आपला एक मराठी युवक "पायरेट्स ऑफ द कॅरिबियन" चित्रपटातल्या संजीवनाशी (ऍनिमेशन) संबंधित असावा ही गोष्ट मला आनंदाची आणि मौजेची वाटली. आपल्या आस्वादासाठी हा लेख येथे उतरवून ठेवत आहे.

म.टा. तला मूळ लेख : हॉलिवुडच्या नभांगणात मुंबईकर ऍनिमेटर!
दिनांक : १ जून २००७

राहुल दाभोळकरचा झगमगता प्रवास

' पायरेट्स ऑफ द कॅरेबियन' आज पडद्यावर

प्रवीण मुळ्ये, मुंबई

वयाच्या पाचव्या वषीर् मिळालेले चित्रकलेतील पहिले बक्षिस. रत्नाकर मतकरींच्या नाट्यशिबिरात गिरवलेले अभिनयाचे धडे. दिलीप प्रभावळकरांसमोर अभिनयकौशल्याला पडलेले पैलू. त्याचवेळी जे. जे. इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट्समधून घेतलेली इलस्टेशनची पदवी. अभिनय आणि चित्रकलेची सांगड घालताना अॅनिमेशनचे तंत्र त्याला गवसत गेले. मुंबईतून सुरू झालेला हा अॅनिमेशन प्रवास अमेरिकेतील वॉल्ट डिस्नेपर्यंत पोहोचला आणि अनेक हॉलिवुड फिल्म्समधील अॅनिमेशन चमत्कारांमुळे त्याचा कर्ता तेथे स्टार बनला. या मराठी ताऱ्याचे नाव राहुल दाभोळकर.

ज्युरासिक पार्क, स्टार वॉर, द मास्क, ममी, ममी रिर्टन्स, हॅरी पॉटर.. या हॉलिवुड ब्लॉक बस्टर्सचे जनक असलेल्या जॉर्ज लुकास यांच्या लाडक्या अॅनिमेटर्समध्ये राहुलचा समावेश आहे. 'पायरेट्स ऑफ द कॅरेबियन-पार्ट थ्री'साठीच्या कामासाठी उत्कृष्ट दिग्दर्शकाचा ऑस्कर पुरस्कार मिळवणारे माटिर्न स्क्रोसिस यांच्यासारख्या दिग्गजांची त्याने वाहवा मिळवली. अॅनिमेशन कौशल्यामुळे कौतुकाचा विषय झालेला हा चित्रपट शुक्रवारी भारतात प्रदशिर्त होत आहे.

' काम करेन तर अॅनिमेशन शहेनशहा जॉर्ज लुकास यांच्यासोबतच' या जिद्दीने अॅनिमेशनमधील बारकावे शिकण्यासाठी राहुलने अमेरिका गाठली. वॉल्ट डिस्नेसोबत 'बझ लाइट इयर', 'विनी द पू', 'सिन्ड्रेला'च्या निमितीर्त त्याने महत्त्वाची भूमिका बजावली. त्यानंतर त्याला ख्रिस्तोफर रिव्ह यांची 'एव्हरीवन हिरो' ही फिल्म मिळाली. त्यानेच राहुलला जॉर्ज लुकास यांच्या 'लुकास फिल्म'मध्ये काम करण्याची संधी दिली.

' ज्या चित्रपटाने मी वेडा झालो, त्याच 'पायरेट्स ऑफ द कॅरेबियन'च्या पार्ट थ्रीच्या निमिर्तीत माझा सहभाग आहे, यावर काही काळ विश्वासच बसत नव्हता. काम नेमके कसे करावे, त्याच्याशी प्रामाणिक कसे राहावे, पाय जमिनीवर कसे ठेवावेत अशा अनेक गोष्टी तेथे शिकायला मिळाल्याचे राहुलने 'मटा'ला सांगितले.

गुड बॉय, नॉटी प्रोफेसर या मोठ्या फिल्मचा अॅनिमेशन भाग आता राहुल सांभाळतोय. स्टुडिओच्या कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाची जबाबदारीही त्याच्यावरच आहे. सध्या हिंदीत मुलांच्या फिल्ममध्येही अॅनिमेशन कौशल्य वापरले जात आहे. ज्युरासिक, कॅरेबियनसारख्या फिल्म्सच्या धतीर्वर बॉलिवूडने हे तंत्र आत्मसात करणे आवश्यक असून त्यासाठी पूर्ण सहकार्य देण्याची राहुलची तयारी आहे.