मन पाखरू पाखरू...

एकच मजकूर अनेक ठिकाणी लिहू नये...
सुधारणा करून लिहिण्यासदेखील वाव नाही एकंदरीत...
काळ्या दगडावरची रेष म्हणावी. आता दगड महत्त्वाचा की रेष? रेषेचे महत्त्व न पाळल्याने रामायण झाले...पण ५००० वर्षांनीही आपण दगडामध्येच अडकतो.
दगडाचेही किती प्रकार पण आपले आणि परके करायचे व आपला दगड टणक म्हणायचा...दगडात झरा असो की नसो.
आपले दगड दुसरीकडे गेले तर त्यांनी आपली टिमकी वाजवायची पण दुसरे दगड आपल्याकडे आले की त्यांनी आपले व्हावे ही अपेक्षा करायची...
बाळ्या आणि कार्टे...

उजवे आणि डावे म्हणजे नक्की काय लहानपणी कळत नसे...धुता-जेवता, बाया-दाहीना, लेफ़्ट-राइट एव्हढेच समजत असे...
राइट किती राँग आहे कळायला ३५ वर्षे, काही राज्ये आणि काही देश लागले... लहानपणापासूनच हुशार(!) म्हणे...
६ डिसेंबर ९२, १२ मार्च १९९३, ९ सप्टेंबर २००१ ते ७ जुलै २००६ सगळ्याचे रंग सारखेच असतात हे कळले. गंमतच आहे...हिरवा, भगवा, निळा, तिरंगा, आडवा तिरंगा आणि  लाल पट्टे, लाल फुल्या एकत्र केले तर पांढरा होतो...काळ्याचे पांढरे आणि पांढऱ्याचे काळे...

तुम एक मारोगे तो हम तीन..‌सलीम जावेद ने तत्त्वज्ञान लिहिले...९/११ काय? देशच उडवितो..एकच कशाला दोन दोन उडवितो. त्यांचे मरतातना मरू देत...

ते आणि आपण..
आपल्यातला आणि परका...
आतले आणि बाहेरचे..
बाहेर गेल्यावर ...बाहेरचे आतले झालेत...आपण बाहेरचे झालोत..म्हणून अक्कल आली का? आली का खरंच.. की..̱ गेली शेण खायला..

असो..डोकं भण भण करतं अशाने.

आनंदी विचार..(हॅपी थॉटस)..आनंदी बाईंना काय विचारावे त्यांचे कष्ट वेगळेच... त्यांच्याबद्दल आदर वाटावा तितका कमीच.. आम्ही १२० वर्षांनी देखील "जयकर" वापरला... निदान लाज राखली..
राखून ठेवण्यावरून जे चालले आहे ते तर आपल्या पलीकडे आहे... आपली पोचच कमी.. आम्ही फक्त लाजच राखण्याचे काम केले.

खान्देश ते वेस्टमिन्स्टर पण केले... पण त्यात खरंच अभिमान वाटायला हवा का?
आपले सोडून दुसरीकडे नाव झाले म्हणजे कौतुक हा काय न्याय?

न्याय...हम्म!!!

एकच मजकूर अनेक ठिकाणी लिहू नये.

ज्याच्या हाती छडी तो मास्तर... मास्तर ही गेला बाहेर.. ऑगस्टीन बाबाच्या देशात/राज्यात... मास्तर मोठाच आहे.
आजकाल मास्तर आऊट सोर्सींग करतोय... प्रत्येक मास्तर सारखा नसतो..  

चांगभलं...