परवा tv वर "आपण ह्याना पहिलत काय", मी पाहत होतो,
गौर वर्ण, मध्यम बांधा, आणि खूप छान हसतो,
हसताना कधी कधी इरफान पठाण भासतो,
पण उगाचच नुसता चिडत असतो.
असे वर्णन सांगून, तिथे एक फोटो लागला...
मनी होता अभि, तो चक्क TV त दिसला..
सोबतच एक पत्ता आणि फोन क्रमांक सुद्दा आला...
माझे मला समजेना, हा अभि कुठे गेला...