बोलण्याने बाप बघ जागेल आता

 आमची प्रेरणा चित्तरंजन यांची सुरेख गझल  बोलण्याने बोलणे वाढेल आता

बोलण्याने बाप बघ जागेल आता
बोललो नाही तरी चालेल आता

आज आहे पूर्ण बंदोबस्त केला,
मी कसा बघतोच तो धावेल आता

हातघाई येवढी नाही बरी पण,
संयमाने काय मज साधेल आता

या नदीला पार कर, थोडे पुढे जा
ओळखीचा बार बघ लागेल आता

दुःखही याहून भीषण दुःख नाही
- ती म्हणे राखी मला बांधेल आता

"केशवा"ची खरडण्याची  वेळ झाली
वाट कवितेची कुण्या लावेल आता!