चिकनचे अगदी लहान लहान तुकडे करून स्वच्छ धुवून घ्यावे. त्यांना आले-लसणाची पेस्ट चोळून पाणी न घालता बंद डब्यात ठेवून कुकरमधे वाफवून घ्यावे.
तव्यावर तेल टाकून तापले की प्रथम जास्तशी लाल तिखटाची पूड व चवीनुसार मीठ घालून त्यात हे आधी शिजवलेले कोंबडीचे तुकडे परतत रहावे. तळसल्यासारखे चुरचुरीत झाले पाहिजेत.मग वर लिंबू पिळून गरमा गरम खायला द्यावे.
सोबत कच्च्या कांद्याच्या चकत्या, काकडी, टोमॅटोच्या चकत्या कैरीची फोडी असतील तर अजून मस्तच!!
चिकन परतून चांगली झणझणीत तिखट आंबट करायला हवी. म्हणून लाल मिरची पावडर, लिंबू व मीठ सढळ हाताने परंतु योग्य प्रमाणात वापरावे.
एकदम सोपी व करायला झटपट व तेवढीच चविष्ट देखील!!
स्वत:चा प्रयोग
निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरण
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.