मसूर बिर्याणी

  • १ वाटी बासमती तांदुळाचा शिजवलेलामोकळा भात, १/२ वाटी मोड आलेले मसूर
  • शिजवलेले, ३ चमचे तेल, १ कांदा, १/२ चमचा आलं-लसणाच वाटण,१ मोठा
  • टमाटा, १/२ वाटी दही, अख्खा मसाला(१ तेजपान,३ लवंगा,३मिरी,
  • दालचिनीचा तुकडा, २ जावित्री, २ वेलदोडे) १/४ गरम मसाला पावडर
  • मीठ चवीनुसार, २ चमचे साजुक तूप
  • सजावटीकरिता- तळलेला कांदा,व काजू व बारीक चिरलेली कोथिंबीर
१ तास

गॅसवर कढई तापत ठेवावी. कढई तापल्यावर त्यात तेल घालावे. तेल तापल्यावर त्यात अख्खा मसाला, उभा बारीक चिरलेला कांदा, आलं-लसणाच वाटण घालावे. कांदा तांबूस झाला की बारीक चिरलेला टमाटा घालावा. टमाटा नरम झाला की त्यात गरम मसाला पावडर, मसूर व मीठ घालून १ मि. परतून घ्यावे. एका काचेच्या भांड्याला आतून सगळ्या बाजूने तूप लावून घ्यावे. भांड्यात भाताचा एक थर त्यावर मसुराचा थर असे दोन थर देऊन  त्यावर तूप सोडून १० मि. ग्रिल करावे. काजू, कांदा व कोथिंबिरीने सजवावे.

 उकडलेले गोड मक्याचे दाणे  टाकून जास्त सुशोभित करता येईल. अतिसुक्ष्मलहर भट्टी नसेल तर एका जाड बुडाच्या भांड्यात थर लावावे व गॅसवर तवा ठेवून त्यावर हे भांड ठेवून मंद आचेवर १० मि. शिजवावे.

स्वप्रयोग