हे आधी का नाही घडले?

हे आधी का नाही घडले?

मॅकडोनाल्ड्स खाद्यपदार्थ मालिकेच्या मार्फत विकण्यासाठी जोरदार जाहिरातींचा आणी खेळण्याच्या रूपाने लाचखोरी करून लहान मुलांचा वापर करून घेत असते.  मात्र त्याच वेळी त्यांनी 'ग्राहकाचे समाधान म्हणजे काय', याची फोड करून ग्राहकाला काय नेमके दिल्याने आनंद मिळतो याचे काही नियम बनवले आहेत. हे नियम ग्राहकाचे जगभरातले वागणे आणि काही मूळ गरजा याचा विचार करून बनवले गेले आहेत. हे पुढे देत आहे. (याला ते 'कस्टमर' एटिकेटस म्हणतात!)

० ग्राहक सदैव बरोबर असणार!
१. ग्राहक आल्यावर त्याचे 'हसतमुख' स्वागत
२ ग्राहक मागणीला 'तत्काळ' प्रतिसाद
३ अजून काही हवे आहे का? अशी पुरवणी प्रश्न विचारणे
(ग्राहक अनायासेच आत आलेला आहे, त्याने अजून घेतले तर अजून खप!)
४ योग्य पैसे घेऊन सुटे पैसे तयार देणे
५ सुट्या पैशांसाठी खळखळ न करणे
६ खाद्यपदार्थ व पैसे हातात देणे
७ हसतमुख निरोप

आपल्याला काय वाटते

अ. अशा रीतीने ग्राहकाच्या गरजांची फोड करून त्याला योग्य अशी प्रतिसादात्मक वागण्याची आखणी करणे हे आपल्याकडे इतक्या भारतात 'आय आय एम सारख्या संस्था असतानाही' का घडले नसावे?

ब. आपल्याला हे नियम योग्य वाटतात का?

क. यात अजून काय असायला हवे?

ड. जगभरातले ग्राहक सगळीकडे सारखेच वागणार असे मॅक ला का वाटते? की ही एक मानवाच्या मुख्य गरजांपैकी आहे?

इ. अशा रीतीनेच सगळेच दुकानदार वागायला लागले तर या युक्तीचा काही प्रभाव उरेल का?

आपला
गुंडोपंत