पाउस, थोडा तिचा.... थोडा माझा...
मला थोडी गरम भजी, तिला लिप्टन ताजा..
मला आवडतो मुसळधार पाउस,
भिजायचं असत खूप..
तिचा पाउस खिडकीबाहेर, आणि
माझ्या कुशीची ऊब..
माझा पाउस करतो मस्ती, आडवा तिरपा पडतो..
तिचा पाउस संततधार, मुक्यानेच रडतो..
पावसावरती करतो आम्ही इतकं उत्कट प्रेम..
होऊन जातो त्याचेच मग, बनून दोन थेंब..
पण आवडतो मला सगळ्यात जो, म्हणतो नको जाऊस..
माझ्यासाठी माझा फक्त, तिच्या डोळ्यांतला पाउस..