पाऊस आणि प्रौढ शिक्षण

जेव्हापासून प्रौढ शिक्षण वर्गात प्रवेश घेतलाय
पावसाला टरकून असतो मी

माझ्या गावातून निघणाऱ्या
हरएक एसटीच्या धूळभरल्या पाठीवर
तुझ्या नावाची अक्षरे
कोरली आहेत मी

ती धुवून टाकील ना हा पाऊस

राजेंद्र प्रधान