मत तयार झाले की विचार तयार होतात,
विचार झाला की संस्कार तयार होतात,
संस्कार झाले की कुटुंब तयार होतात
कुटुबं झाले की समाज तयार होतो
समाज तयार झाल्यावर उरतं तरी काय?
देश तयार व्हायला अजुन हवयं तरी काय?
बोलता बोलता विचार बदलतात
विचार बदलले की संस्कार बदलतात
आता तर ’फ़्रेंडशिप’ आणि ’वॅलेंटाईन’ चे दिवस आलेत
असं ही ऐकलयं की एका रात्रीत जोडीदार बदलतात
जोडीदार बदलले की उरतं तरी काय?
प्रेमाचं वासनेत रुपांतर व्हायला अजुन हवयं तरी काय?
मते संपली तिथे विचार संपतात
विचार संपले की संस्कार संपतात
संस्कार संपले की कुटुंब संपते
कुटुंब संपले की समाज संपतो
समाज संपला की उरतं तरी काय?
एखाद्या देशाला संपायला अजुन हवयं तरी काय?
प्रेमात पोर-पोरी नेहमी वेडी होतात
धर्म आणि जातींच्या जाळ्यातुन पुढे निघतात
पुढ निघण्याच्या प्रयत्नात ते जरा जास्तच पुढे जातात
दोन धर्माची लोकं मग आपापसात भांडतात
भांडणे झाल्यावर उरतं तरी काय?
दंगल भडकायला अजुन हवं तरी काय?
आजलच्या पोरी कमवायला बाहेर पडतात
आयुष्यात काही तरी करायला धडपडतात
पणं बाहेर आल्यावर एखाद्या नालायकाच्या नजरेसं पडतात
त्याच्या वासनेच्या बळी जातात
अब्रु गमवतात
अब्रु गेल्यावर उरतं तरी काय?
त्यांच्या कडे अब्रुशिवाय असतं तरी काय?
म्हणुनच पुन्हा लिहितो,
मत तयार झाले की विचार तयार होतात,
विचार झाला की संस्कार तयार होतात,
संस्कार झाले की कुटुंब तयार होतात
कुटुबं झाले की समाज तयार होतो
समाज तयार झाल्यावर उरतं तरी काय?
देश तयार व्हायला अजुन हवयं तरी काय? @ सचिन काकडे [जुलै ०१,२००७]